चंद्रपूर- चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर येथे लालबहादूर शास्त्री विद्यालयाची बस हरदोना गावाजवळ उलटली. या बसमध्ये ६० विद्यार्थी होते त्यातील सुमारे वीस विद्यार्थी जखमी झाले आहेत.विद्यार्थ्यांना घेऊन ही बस शाळेकडे निघाली होती. मात्र वाटेत चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस रस्त्याच्या कडेला उलटली. अपघाताची माहिती मिळताच गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन विद्यार्थ्यांना बाहेर काढले. जखमी विद्यार्थ्यांना गडचांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात तातडीने दाखल केले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.









