Home / News / आणखी एका दांडिया किंगचा गरबा खेळताना हार्टअॅटॅकने मृत्यू

आणखी एका दांडिया किंगचा गरबा खेळताना हार्टअॅटॅकने मृत्यू

पुणे – नवरात्रोत्सवात गरबा खेळताना आणखी एका दांडिया सिंगचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना पुण्यात घडली आहे. अशोक माळी असे...

By: Team Navakal
Social + WhatsApp CTA

पुणे – नवरात्रोत्सवात गरबा खेळताना आणखी एका दांडिया सिंगचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना पुण्यात घडली आहे. अशोक माळी असे या व्यक्तीचे नाव आहे.पुण्यातील चाकण परिसरात आपल्या मुलासोबत दांडिया खेळत असताना ते अचानक भोवळ येऊन खाली कोसळले. त्यांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले , मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.व्हिडिओमध्ये माळी आपल्या मुलासोबत गरबा खेळताना दिसतात. अचानक ते जमिनीवर कोसळतात.त्यानंतर त्यांना काही लोक उचलून नेताना दिसतात. चार दिवसांपूर्वी जळगावच्या पाचोरा शहरातील भडगाव रोडवरील कैलादेवी मंदिराजवळ गरबा खेळत असता लखन प्रेमलाल वाधवानी (२६) या तरुणाचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता.

Web Title:
संबंधित बातम्या