Home / News / नवनीत राणा विधानसभा निवडणूक लढणार नाहीत

नवनीत राणा विधानसभा निवडणूक लढणार नाहीत

रवी राणा यांची माहिती अमरावती -अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा येऊ घातलेली विधानसभा निवडणूक लढविणार नाहीत. त्यांना भाजपाने राज्यसभेवर सदस्यत्व...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

रवी राणा यांची माहिती

अमरावती -अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा येऊ घातलेली विधानसभा निवडणूक लढविणार नाहीत. त्यांना भाजपाने राज्यसभेवर सदस्यत्व देण्याचे आश्वासन दिले आहे,अशी माहिती नवनीत राणा यांचे पती अमरावतीच्या बडनेरा जिल्ह्यातील अपक्ष आमदार रवी राणा यांनी दिली.रवी राणा यांनी प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. नवनीत राणा विधानसभा निवडणूक लढविणार नाहीत. मात्र त्या भाजपाच्या उमेदवाराला निवडणून आणण्यासाठी त्याचा प्रचार करतील,असे रवी राणा यांनी सांगितले.भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवनीत राणा यांना राज्यसभेवर पाठविण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे विधानसभा निवडणूक न लढविणे हे नवनीत राणा यांच्यासाठी योग्य ठरेल,असे रवी राणा म्हणाले.

Web Title:
संबंधित बातम्या