Home / News / शेअर बाजारात पुन्हा घसरण! नफेखोरीमुळे विक्रीचा मारा

शेअर बाजारात पुन्हा घसरण! नफेखोरीमुळे विक्रीचा मारा

मुंबई – शेअर बाजारात आज पुन्हा घसरण झाली. दिवसभराच्या चढ-उतारानंतर दोन्ही निर्देशांक घसरणीसह बंद झाले. वरच्या स्तरावर नफेखोरांनी विक्रीचा मारा...

By: Team Navakal

मुंबई – शेअर बाजारात आज पुन्हा घसरण झाली. दिवसभराच्या चढ-उतारानंतर दोन्ही निर्देशांक घसरणीसह बंद झाले. वरच्या स्तरावर नफेखोरांनी विक्रीचा मारा केला.मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स १५२ अंकांनी घसरून ८१,८२० अंकावर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ७० अंकांनी घसरून २५,०५७ अंकांवर बंद झाला.
बँक निफ्टीमध्ये मात्र काहीही वाढ नोंदवली गेली. बँक निफ्टी ८९ अंकांनी वाढून ५१,९०६ अंकांवर बंद झाला.दिवसातील व्यवहारात बँकिंग, एफएमसीजी, रिअल इस्टेट, मीडिया आदि क्षेत्रांतील कंपन्यांच्या शेअरमध्ये खरेदी दिसून आली. तर ऑटोमोबाईल, आयटी, फार्मास्युटिकल, मेटल आणि एनर्जी या शेअर्सची विक्री झाली.

Web Title:
संबंधित बातम्या