Home / News / हिमाचलमध्ये भूकंपाचे धक्के

हिमाचलमध्ये भूकंपाचे धक्के

शिमला- हिमाचल प्रदेश मंडी शहरात आज दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. रिक्टर स्केलवर त्याची तीव्रता ३.३ इतकी मोजली...

By: E-Paper Navakal

शिमला- हिमाचल प्रदेश मंडी शहरात आज दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. रिक्टर स्केलवर त्याची तीव्रता ३.३ इतकी मोजली गेली. जमिनीखाली त्याची खोली ५ किलोमीटर होती. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी च्या मते, मंडी, हिमाचल प्रदेश येथे दुपारी १२ वाजता भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. यामध्ये कोणतीही जीवितहानी आणि वित्तहानी झाली नाही. मंडी जिल्ह्यातील बहुतांश भाग झोन ५ मध्ये येतात, जे भूकंपाच्या दृष्टिकोनातून अत्यंत संवेदनशील आहे. त्यामुळे येथे वारंवार भूकंपाचे धक्के जाणवतात.

Web Title:
संबंधित बातम्या