Home / News / श्रीलंकेतील अदानींच्या पवनऊर्जा प्रकल्पाचा परवाना रद्द होणार ?

श्रीलंकेतील अदानींच्या पवनऊर्जा प्रकल्पाचा परवाना रद्द होणार ?

कोलंबो – अदानी उद्योग समूहाला श्रीलंकेत पवन ऊर्जा प्रकल्प उभारण्यास तत्कालीन सरकारने दिलेल्या मंजुरीचा फेरविचार केला जाईल,असे अनुरा कुमार दिसानायके...

By: E-Paper Navakal

कोलंबो – अदानी उद्योग समूहाला श्रीलंकेत पवन ऊर्जा प्रकल्प उभारण्यास तत्कालीन सरकारने दिलेल्या मंजुरीचा फेरविचार केला जाईल,असे अनुरा कुमार दिसानायके सरकारने स्पष्ट केले. या पार्श्वभूमीवर सरकारच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात ही माहिती देण्यात आली.सध्या काळजीवाहू सरकारचे प्रमुख असलेल्या आणि राष्ट्राध्यक्षपदाच्या दावेदार असलेल्या अनुरा कुमार दिसानायके यांच्या आघाडीचा अदानी समूहाच्या या पवन ऊर्जा प्रकल्पाला विरोध आहे. देशाच्या वीजेसंबंधीच्या स्वयंपूर्णतेला या प्रकल्पामुळे धक्का लागू शकतो,अशी भीती दिसानायके यांनी व्यक्त केली आहे.आपले सरकार सत्तेत आले तर हा प्रकल्प आम्ही निश्चितच रद्द करू,असे आश्वासन दिसानायके यांनी वारंवार दिले आहे.त्यामुळे अदानी समूहाचा हा वीज प्रकल्प अडचणीत आला आहे.

Web Title:
संबंधित बातम्या