Home / News / समृद्धी महामार्गावर ट्रकलाकारची धडक! एकाचा मृत्यू

समृद्धी महामार्गावर ट्रकलाकारची धडक! एकाचा मृत्यू

वाशीम – समृद्धी महामार्गावर ट्रकला भरधाव कारने मागील बाजूने जोरदार धडक दिली. त्यात कारचालकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना वाशीम...

By: netadmin

वाशीम – समृद्धी महामार्गावर ट्रकला भरधाव कारने मागील बाजूने जोरदार धडक दिली. त्यात कारचालकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना वाशीम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यात आज पहाटे घडली. बळीराम ग्यानबा पिसे (२४) असे मृताचे नाव आहे.समृद्धी महामार्गावर नागपूरवरून लोणारकडे कारने बळीराम पिसे जात होते. वालई येथे ही कार ट्रकला मागून धडकली. या धडकेचा प्रचंड मोठा आवाज होताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. या धडकेत कारचालकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. चालकाचा मृतदेह कारमध्ये अडकला होता. समृद्धी महामार्गाच्या अग्निशमन दलाने अथक प्रयत्न करून मृतदेह बाहेर काढला.

Web Title:
Topics:
संबंधित बातम्या
To use reCAPTCHA V3, you need to add the API Key and complete the setup process in Dashboard > Elementor > Settings > Integrations > reCAPTCHA V3.