मेट्रो-३ वरून विमानतळावर जाण्या-येण्यासाठी मोफत बससेवा

मुंबई- मुंबई मेट्रो-३ सेवेच्या टी-२ स्थानकापासून आंतरराष्ट्रीय विमानतळ जवळ असल्याने मुंबई मेट्रो प्राधिकरणाने विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मोफत बससेवा सुरू केली आहे.मुंबई मेट्रो रेल्वे प्राधिकरणाच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात ही माहिती दिली आहे.या बसमध्ये प्रवाशांना त्यांच्या सामानासाठी लोडर सुविधाही उपलब्ध असेल.

विमानतळाहून आरे ते बीकेसीपर्यंत जाणाऱ्या प्रवाशांसाठी एमएमआरसीने मोफत बस सेवेची सुविधा सुरू केली आहे.यानुसार २१ आसनी बस ही दर १५ मिनिटांनी विमानतळ ते मेट्रो स्थानकापर्यत धावणार आहे.यामुळे विमानतळाहून मेट्रो पकडणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. विमानतळ ते मेट्रो सेवा ही दर १५ मिनिटांनी सुरू असेल. यामध्ये प्रवाशांना लोडर सेवाही उपलब्ध होईल.सोमवार ते शनिवारी सकाळी ६.३० ते रात्री ११ वाजेपर्यंत तर रविवार सकाळी ८.१५ ते ११ वाजेपर्यंत ही सेवा सुरू राहणार आहे.