Home / News / मालवण शिवपुतळा प्रकरण! आरोपीला न्यायालयीन कोठडी

मालवण शिवपुतळा प्रकरण! आरोपीला न्यायालयीन कोठडी

मालवण – मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या तिसऱ्या संशयित आरोपीला कनिष्ठ न्यायालयाने २५ ऑक्टोबरपर्यंत...

By: E-Paper Navakal

मालवण – मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या तिसऱ्या संशयित आरोपीला कनिष्ठ न्यायालयाने २५ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. परमेश्वर रामनरेश यादव असे आरोपीचे नाव आहे.त्याला पोलिसांनी उत्तर प्रदेशच्या मिर्झापूरमध्ये जाऊन अटक केली. त्याच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने आज त्याला मालवण न्यायालयात हजर करण्यात आले.

२६ ऑगस्ट २०२४ रोजी राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा वादळी वाऱ्यामुळे कोसळला. या प्रकरणी पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटे आणि आर्किटेक्ट सल्लागार चेतन पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. हे दोघे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.

Web Title:
संबंधित बातम्या