Home / News / मुंबईत ‘फ्लाइंग कंदील’च्या वापरावर महिनाभर बंदी

मुंबईत ‘फ्लाइंग कंदील’च्या वापरावर महिनाभर बंदी

मुंबई- आता महिनाभर मुंबई शहरात फ्लाईंग कंदिलाच्या म्हणजेच आकाशात उडणाऱ्या कंदिलाच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. इतकेच नाही तर या...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

मुंबई- आता महिनाभर मुंबई शहरात फ्लाईंग कंदिलाच्या म्हणजेच आकाशात उडणाऱ्या कंदिलाच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. इतकेच नाही तर या कंदीलची विक्री आणि साठा करण्यावरदेखील बंधन राहणार आहे. असामाजिक घटकांच्या कारवाया रोखण्यासाठी महिनाभर ही बंदी राहणार असल्याचे मुंबई पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
सध्या विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. शिवाय सर्वत्र दिवाळीची तयारीदेखील सुरू आहे.दिवाळीत आकाशकंदील उडविण्याचा आनंद लुटला जातो; परंतु असामाजिक घटकांकडून या फ्लाईंग कंदिलांचा दुरुपयोग होऊ नये यासाठी मुंबई पोलिसांनी खबरदारी घेतली आहे. २३ ऑक्टोबर ते २१ नोव्हेंबर या कालावधीत शहरात फ्लाईंग कंदील उडविण्यावर बंदी घालण्यात आली आहे. शिवाय या कंदीलची साठवणूक, विक्री व वापर करण्यासदेखील मज्जाव करण्यात आला आहे. असे असतानाही कोणी हेतुपुरस्सर फ्लाईंग कंदीलचा वापर,विक्री व साठवणूक करणारा सापडेल अशांवर भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम २२३ अन्वये कारवाई करण्यात येईल, असा इशारा मुंबई पोलिसांकडून देण्यात आला आहे.

Web Title:
संबंधित बातम्या