Home / News / संभाजी ब्रिगेडचे ११ उमेदवार जाहीर

संभाजी ब्रिगेडचे ११ उमेदवार जाहीर

पुणे – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबतच्या आघाडीला फारकत देणाऱ्या संभाजी ब्रिगेडने आज विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या ११ उमेदवारांच्या नावांची घोषणा...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

पुणे – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबतच्या आघाडीला फारकत देणाऱ्या संभाजी ब्रिगेडने आज विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या ११ उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांनी ही माहिती दिली.राज्यामध्ये शिवसेना फुटी नंतर ठाकरे गटाला संभाजी ब्रिगेडने पाठबळ दिले होते.आज जाहीर झालेल्या उमेदवारांत प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांनी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली.यामध्ये पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील चंद्रशेखर घाडगे, दौंड विधानसभा मतदारसंघातून अविनाश मोहिते, पुरंदर मधून उत्तम कामठे, हडपसर मधून शिवाजी पवार, खडकवासला मधून स्वप्निल रायकर, चिंचवडमधून अरुण पवार, बारामतीमधून विनोद जगताप यांचा समावेश आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड विधानसभा मतदारसंघातून परशराम कुटे, राधानगरी मधून शहाजी देसाई शाहूवाडी मधून सेवानिवृत्त कमांडर सदानंद मानेकर, सोलापूर मधून अॅड. देवेंद्र वाळके यांनाही उमेदवारी जाहीर झाली.

Web Title:
संबंधित बातम्या