Home / News / अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचा उद्या निकाल

अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचा उद्या निकाल

वॉशिंग्टन – अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी आज मतदान पार पडले असून या निवडणुकीची मतमोजणी पूर्ण होऊन गुरुवारी निकाल लागण्याची शक्यता...

By: E-Paper Navakal

वॉशिंग्टन – अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी आज मतदान पार पडले असून या निवडणुकीची मतमोजणी पूर्ण होऊन गुरुवारी निकाल लागण्याची शक्यता आहे.अमेरिकेच्य राष्ट्राध्यक्षपदासाठी माजी राष्ट्राध्य डोनाल्ड ट्रम्प यांची लढत विद्यमान उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांच्याबरोबर होत आहे. अमेरिकेतील मतदान आज पूर्ण झाले असून काही राज्यात ते उद्या पूर्ण होईल. त्यानंतर मतमोजणीला सुरुवात होईल. सहसा मतदानानंतर काही तासात निकाल अपेक्षित असतात. यावेळची निवडणूक ही अत्यंत अटीतटीची असल्याने त्याला वेळ लागू शकेल. तरीही परवा गुरुवारी हे निकाल स्पष्ट होतील. काही राज्यांमधील कल कमला हॅरिस यांच्या बाजूने जात आहेत असे अमेरिकन माध्यमांनी म्हटले आहे.

Web Title:
संबंधित बातम्या

Share:

More Posts