Home / News / शिंदे, फडणवीस, अजित पवार महाराष्ट्राचे तीन शत्रू! संजय राउतांचा घणाघात

शिंदे, फडणवीस, अजित पवार महाराष्ट्राचे तीन शत्रू! संजय राउतांचा घणाघात

मुंबई – शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

मुंबई – शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यावर सडकून टीका केली. शिंदे, फडणवीस आणि अजित पवार हे स्वाभिमानी महाराष्ट्राचे तीन प्रमुख शत्रू आहेत.त्यांनी सुसंस्कृत महाराष्ट्राचे गटारात रुपांतर केले,अशी घणाघाती टीका राऊत यांनी केली. शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेच्या संदर्भात ते बोलत होते.

केंद्रात नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या हाती देशाची सुत्रे आल्यापासून संपूर्ण देशातील राजकारणाचा चेहरा-मोहराच बदलून गेला आहे.सभ्य-सुसंस्कृत राजकारणाची जागा सुडाच्या आणि विखारी राजकारणाने घेतली. मोदी-शहांना महाराष्ट्रात धिंगाणा घालण्यासाठी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे मदत करीत आहेत.सुसंस्कृत महाराष्ट्रात त्यामुळे राजकारणाचा चिखल झाला आहे. हे तीन जण महाराष्ट्राचे सर्वात मोठे शत्रू आहेत,असे राऊत म्हणाले.

Web Title:
संबंधित बातम्या