Home / News / धावत्या बसमध्ये चालकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

धावत्या बसमध्ये चालकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

बंगळुरू- कर्नाटकातील बंगळुरु महानगर परिवहन सेवेच्या धावत्या बसमध्ये चालकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. किरण असे बस चालकाचे नाव असून तो...

By: E-Paper Navakal

बंगळुरू- कर्नाटकातील बंगळुरु महानगर परिवहन सेवेच्या धावत्या बसमध्ये चालकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. किरण असे बस चालकाचे नाव असून तो ४० वर्षांचा होता.

बस चालक किरण हा बंगळुरू परिवहनची बस घेऊन निलमनगरहून यशवंतपूर येथे चालला होता.त्यावेळी वाटेत अचानक त्याच्या छातीत दु:खू लागले. त्याची शुद्ध हरपली. तो स्टेअरिंगवरच कोसळला. सुदैवाने जवळच उभ्या असलेल्या कंडक्टरच्या हा प्रकार लक्षात आला. त्याने लगेच स्टेअरिंगचा ताबा आपल्या हाती घेऊन बस थांबवली. यामुळे मोठी दुर्घटना टळली.त्यानंतर किरणला लगेच जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्याला मृत घोषित केले.

Web Title:
संबंधित बातम्या