रत्नागिरी- मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात ट्रकचा अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र अपघातामुळे परशुराम घाटातील वाहतूक ठप्प झाली होती. तीन ते चार किलोमीटरपर्यंत गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यानंतर एकेरी वाहतूक चालू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला.

								
								
								
								
								
				
															
								
								
								
								
								
								







