Home / News / कार्तिकीनिमित्त पंढरपुरात भाविकांची मोठी गर्दी

कार्तिकीनिमित्त पंढरपुरात भाविकांची मोठी गर्दी

पंढरपूर – कार्तिक यात्रेनिमित्त पंढरपुरातील विठ्ठल मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. विठ्ठलाच्या दर्शनासाठी ३ किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या आहेत.पंढरपुरात...

By: E-Paper Navakal

पंढरपूर – कार्तिक यात्रेनिमित्त पंढरपुरातील विठ्ठल मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. विठ्ठलाच्या दर्शनासाठी ३ किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या आहेत.पंढरपुरात सध्या लाखो भाविक दाखल झाले असून विठू नामाच्या गजराने पंढरीनगरी अवघे दुमदुमून गेली आहे. भाविकांच्या गैरसोय होऊ नये म्हणून मंदिर समितीने दर्शन रांगेतील भाविकांना पिण्याचे पाणी, आरोग्य, चहा, नाश्ता, जेवण आणि अन्य सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. भाविकांसाठी ठिकठिकाणी पंखे आणि कुलरची व्यवस्था केलेली आहे. १२ नोव्हेंबर रोजी पहाटे अडीच वाजता विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न होणार आहे.

Web Title:
संबंधित बातम्या