Home / News / गोवाच्या मोपा विमानतळावर पहिले पोलंडचे विमान दाखल

गोवाच्या मोपा विमानतळावर पहिले पोलंडचे विमान दाखल

पणजी- गोव्यातील मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर शुक्रवारी पोलंडमधून एंटर एअरच्या पहिल्या हंगामी चार्टर फ्लाइटचे स्वागत करण्यात आले.या विमानातून १८४...

By: E-Paper Navakal

पणजी- गोव्यातील मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर शुक्रवारी पोलंडमधून एंटर एअरच्या पहिल्या हंगामी चार्टर फ्लाइटचे स्वागत करण्यात आले.या विमानातून १८४ पर्यटक गोव्यात दाखल झाले आहेत.

वॉर्सा आणि काटोविस येथून थेट उड्डाणे गोव्याला पोलंडशी जोडतात.गोव्याचे पर्यटन वाढणार असून स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी ही विमान सेवा अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे मोपा विमानतळाचे सीईओ शेषन यांनी सांगितले. दर सोमवार आणि शुक्रवारी ही सेवा कार्यरत असेल. मोपा विमानतळ आंतरराष्ट्रीय आणि चार्टर उड्डाणांसाठी एक पसंतीचे विमानतळ म्हणून उदयास येत आहे. गेल्या काही महिन्यांत मॉस्को, ताश्कंद, गॅटविक आणि मँचेस्टर यांच्याशी हवाई संपर्क स्थापित केला आहे असे शेषन यांनी सांगितले

Web Title:
संबंधित बातम्या