Home / News / कर्जत-खोपोली महामार्गावरील अर्धवट कामांमुळे प्रवास खडतर

कर्जत-खोपोली महामार्गावरील अर्धवट कामांमुळे प्रवास खडतर

कर्जत- महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून बांधलेल्या कर्जत-खोपोली महामार्गावर परसदरी येथील काम अर्धवट स्थितीत आहे.या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले...

By: E-Paper Navakal

कर्जत- महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून बांधलेल्या कर्जत-खोपोली महामार्गावर परसदरी येथील काम अर्धवट स्थितीत आहे.या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून वाहनचालकांचा प्रवास खडतर बनला आहे. शेतकर्‍यांची देणी चुकती न केल्याने हा रस्ता अर्धवट सोडण्यात आला आहे.

परसदरी मार्गातील वर्णे,
परसदरी,तलवली,हाल आणि नावंढे येथील शेतकर्‍यांना त्यांच्या जागेचा मोबदला मिळाला नसल्याने ठेकेदाराने याठिकाणचा रस्ता अर्धवट सोडला आहे. त्यामुळे या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. येथे दिशादर्शक फलकही नाही.त्यामुळे वाहनांच्या अपघातात वाढ झाली आहे.

Web Title:
संबंधित बातम्या

Share:

More Posts