Home / News / पंतप्रधान मोदी यांची आज खारघरमध्ये सभा

पंतप्रधान मोदी यांची आज खारघरमध्ये सभा

नवी मुंबई – रायगड, ठाणे शहर आणि नवी मुंबईतील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खारघर सेक्टर २९...

By: E-Paper Navakal

नवी मुंबई – रायगड, ठाणे शहर आणि नवी मुंबईतील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खारघर सेक्टर २९ मधील सेंट्रल पार्कजवळील मैदानात जाहीर सभा होणार आहे. या सभेसाठी भाजपा पदाधिकाऱ्यांची तयारी पूर्ण झाली आहे.या सभेसाठी भव्य व्यासपीठ उभारण्यात आले आहे. ५० हजार लोक सभास्थळी उपस्थित राहण्याची शक्यता आहेत. नरेंद्र मोदी यांच्यासाठी खारघर येथील पेठपाडा मेट्रो रेल्वे स्थानकाच्या बाजूला असलेल्या मैदानात हेलिपॅड उभारण्यात आले आहे. या सभेसाठी १२०० हून अधिक पोलीस तैनात केले जाणार आहे. खारघरबाहेरुन शेकडो वाहने खारघरमध्ये दाखल होणार असल्यामुळे अनेक रस्त्यांवरील वाहतुकीत पोलिसांनी बदल केले आहेत.

Web Title:
संबंधित बातम्या