Home / News / शरद पवारांच्या साताऱ्यात दोन दिवसांत पाच सभा

शरद पवारांच्या साताऱ्यात दोन दिवसांत पाच सभा

सातारा- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे सातारा हा बालेकिल्ला राखण्यासाठी दोन दिवसांत पाच सभा घेणार आहेत. ते एक दिवस...

By: E-Paper Navakal

सातारा- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे सातारा हा बालेकिल्ला राखण्यासाठी दोन दिवसांत पाच सभा घेणार आहेत. ते एक दिवस साताऱ्यात मुक्कामही करणार आहेत.

विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरू झाल्यापासून शरद पवार साताऱ्यात आलेले नाहीत. त्यांनी शेवटच्या टप्प्यातच त्यांनी साताऱ्यात प्रचार करण्याचे ठरविले आहे. निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात त्यांच्या सभांचे नियोजन करण्यात आले आहे. यातून बालेकिल्ला पुन्हा राखण्यासाठीच त्यांची ही रणनीती असल्याचा अंदाज आहे. यासाठी ते १५ नोव्हेंबरला सातारा मुक्कामी आहेत. यादिवशी त्यांची कराड उत्तर मतदारसंघात रहिमतपूरला सभा होईल.तसेच १६ नोव्हेंबरलाही ते वाई,कोरेगाव,दहिवडी आणि फलटण येथे चार सभा घेणार आहेत.राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष माण,फलटण, वाई, कराड उत्तर आणि कोरेगाव हे पाच मतदारसंघ लढवत आहे.

Web Title:
संबंधित बातम्या