Home / News / कोल्डप्लेचा चौथा शो अहमदाबादमध्ये होणार

कोल्डप्लेचा चौथा शो अहमदाबादमध्ये होणार

अहमदाबाद -भारतात कोल्डप्लेच्या म्युझिक ऑफ द स्फिअर्स वर्ल्ड टूरच्या तिकिटांच्या काळाबाजाराचे प्रकरण ताजे असतानाच कोल्डप्ले बँडने भारतातील चौथ्या कार्यक्रमाची घोषणा...

By: E-Paper Navakal

अहमदाबाद -भारतात कोल्डप्लेच्या म्युझिक ऑफ द स्फिअर्स वर्ल्ड टूरच्या तिकिटांच्या काळाबाजाराचे प्रकरण ताजे असतानाच कोल्डप्ले बँडने भारतातील चौथ्या कार्यक्रमाची घोषणा केली आहे. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर २५ जानेवारी २०२५ रोजी हा कार्यक्रम होणार आहे. या कॉन्सर्टची तिकिटे १६ नोव्हेंबरपासून रोजी दुपारी १२ वाजता बुक माय शोवर उपलब्ध होतील. याबाबत कोल्डप्ले बँडने अधिकृत एक्स अकाऊंटवर माहिती पोस्ट केली आहे. प्रसिद्ध गायक ख्रिस मार्टिन, गिटारवादक जॉनी बकलँड, बासवादक गाय बेरीमन आणि ड्रमर विल चॅम्पियन या शोमध्ये सादरीकरण करणार आहे.

कोल्डप्लेने गेल्या महिन्यात १८ आणि १९ जानेवारी २०२५ रोजी मुंबईतील डीवाय पाटील स्पोर्ट्स स्टेडियमवर दोन कार्यक्रम करण्याची घोषणा केली होती. या कार्यक्रमांच्या तिकिटांची ऑनलाईन विक्री सुरू झाल्यानंतर काही मिनिटांत सर्व तिकीटे विकली गेली होती. त्यानंतर या तिकिटांमध्ये मोठ्या प्रमाणात काळाबाजार झाल्याचा आरोप होऊन झाला होता. त्यानंतर यामुळे बुक माय शो या संकेतस्थळाच्या मूळ कंपनीविरोधात पोलिसांनी समन्स बजावले होते. त्याची चौकशीही सुरू झाली. कोल्डप्लेच्या कॉन्सर्टच्या तिकिटांची मूळ किंमत २,५०० ते ३५,००० दरम्यान होती. पण या तिकिटासाठी चाहत्यांनी तब्बल ३ लाखांपर्यंतची रक्कम मोजली. तर तिकीट न मिळाल्याने अनेक चाहते नाराज झाले होते. त्यामुळे लोकांची मागणी लक्षात घेऊन २१ जानेवारीला मुंबईतच ठिकाणी तिसरा शो करण्याची घोषणा केली. त्यानंतर चौथा शो अहमदाबादमध्ये होणार आहे. कोल्डप्लेने मुंबईत २०१६ मध्ये शो सादर केला होता. नऊ वर्षांनंतर कोल्डप्ले भारतात पुन्हा शो होणार आहेत.

Web Title:
संबंधित बातम्या