Home / Top_News / मॅच फिक्सिंग चित्रपटाला स्थगितीला नकार

मॅच फिक्सिंग चित्रपटाला स्थगितीला नकार

मुंबई – मुंबई उच्च न्यायालयाने २००८ साली झालेल्या मालेगाव बॉम्बस्फोटाच्या घटनेवर आधारित ‘मॅच फिक्सिंग द नेशन एट स्टेक’ या चित्रपटाच्या...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

मुंबई – मुंबई उच्च न्यायालयाने २००८ साली झालेल्या मालेगाव बॉम्बस्फोटाच्या घटनेवर आधारित ‘मॅच फिक्सिंग द नेशन एट स्टेक’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्यास नकार दिला आहे. या प्रकरणातील एक आरोपी माजी सैनिक प्रसाद पुरोहित यांनी ही याचिका दाखल केली होती.
या चित्रपटाचा मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी सुरु असलेल्या खटल्यावर , त्याचप्रमाणे माझ्या प्रतिष्ठेवर परिणाम होईल असे याचिकाकर्त्याचे म्हणणे होते. यावर आपली बाजू मांडतांना चित्रपट निर्माते म्हणाले की, हा चित्रपट या घटनेवर नसून त्यावर आलेल्या एका पुस्तकावर आधारित आहे. हा चित्रपट काल्पनिक असल्याची अस्विकृतीही या चित्रपटाच्या आधी देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे कोणत्याही खऱ्या व्यक्तीवर आधारित हा चित्रपट नाही.
न्यायमूर्ती बी.पी.कोलाबावाला व सोमशेखर सुंदरनेसन यांच्या पीठाने या चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्यास नकार देतांना त्यात काही बदल सुचवले आहे. न्यायालयाने म्हटले आहे की, याचिकाकर्त्यांची प्रतिष्ठा मलीन होत असल्याचे आम्हाला वाटत नसून जर हे पुस्तक सगळीकडे सहज उपलब्ध असेल तर केवळ चित्रपटाच्या प्रदर्शनाला रोखता येणार नाही.

Web Title:
संबंधित बातम्या