Home / News / डेन्मार्कच्या व्हिक्टोरिया थेलविगनेमिस युनिव्हर्सचा किताब जिंकला

डेन्मार्कच्या व्हिक्टोरिया थेलविगनेमिस युनिव्हर्सचा किताब जिंकला

मेक्सिको – सिटीडेन्मार्कच्या व्हिक्टोरिया थेलविगने यंदाचा मिस युनिव्हर्सचा किताब जिंकला. डेन्मार्कच्या सौंदर्यवतीने मिस युनिव्हर्स स्पर्धा जिंकण्याची ही पहिलीच वेळ आहे....

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

मेक्सिको – सिटीडेन्मार्कच्या व्हिक्टोरिया थेलविगने यंदाचा मिस युनिव्हर्सचा किताब जिंकला. डेन्मार्कच्या सौंदर्यवतीने मिस युनिव्हर्स स्पर्धा जिंकण्याची ही पहिलीच वेळ आहे. मेक्सिको सिटी येथे पार पडलेल्या या स्पर्धेत भारताच्या रिया सिंघाला अंतिम १२ स्पर्धकांमध्ये स्थान मिळाले नाही. यावर्षी जगभरातील १२० हून देशांतील सौंदर्यवतीने या स्पर्धेत सहभाग घेतला होता.२०२३ ची मिस युनिव्हर्स निकाराग्वाची शेनिस पॅलासिओस हिने विजेतेपदाचा मुकूट व्हिक्टोरियाच्या डोक्यावर चढवला. मेक्सिको, नायजेरिया, थायलंड, व्हेनेझुएला आणि डेनमार्क या देशांच्या सौंदर्यवती अंतिम पाचमध्ये पोहचल्या होत्या. नायजेरियाच्या चिदिम्मा अदेत्शिनाला दुसऱ्या आणि मेक्सिकोच्या मारिया फर्नांडा बेल्ट्रानला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. थायलंडची ओपल सुचता चुआंगश्री आणि व्हेनेझुएलाची इलियाना मार्केझाला अंतिम पाचमध्ये होत्या.

Web Title:
संबंधित बातम्या
Medha Kulkarni

Medha Kulkarni : सारथी’च्या कार्यक्रमात पहिल्या रांगेतील बैठकीवरून भाजपात अंतर्गत वाद; शासकीय राजशिष्टाचार कधीही जातीच्या आधारावर ठरत नाही – खासदार मेधा कुलकर्णी आणि आमदार अभिमन्यू पवार आमनेसामने