Home / News / गृह खरेदी फसवणूक प्रकरणगौतम गंभीरला मोठा दिलासा

गृह खरेदी फसवणूक प्रकरणगौतम गंभीरला मोठा दिलासा

नवी दिल्ली – दिल्‍लीतील गृह खरेदीदारांच्‍या फसवणूकप्रकरणी भारतीय क्रिकेट संघाचे मुख्‍य प्रशिक्षक गौतम गंभीर यांना आज दिल्‍ली उच्‍च न्‍यायालयाने मोठा...

By: E-Paper Navakal

नवी दिल्ली – दिल्‍लीतील गृह खरेदीदारांच्‍या फसवणूकप्रकरणी भारतीय क्रिकेट संघाचे मुख्‍य प्रशिक्षक गौतम गंभीर यांना आज दिल्‍ली उच्‍च न्‍यायालयाने मोठा दिलासा दिला. याप्रकरणी त्याच्या दोषमुक्‍तीविरोधातील आदेशाला स्‍थगिती देत फसवणुकीचा खटला पुन्हा सुरू करण्याच्या सत्र न्यायालयाच्या निर्णयाला दिल्ली उच्च न्यायालयाने स्थगिती दिली.गौतम गंभीरने उच्च न्यायालयात फसवणुकीच्या खटल्यातून मुक्त करण्याचा सत्र न्‍यायालयाच्‍या आदेश रद्द करण्‍याच्‍या निर्णयाला आव्हान दिले होते. रुद्र बिल्डवेल, एचआर इन्फ्रासिटी आणि यूएम आर्किटेक्चर्स या गृहनिर्माण कंपन्यांनी घर खरेदीदारांना फ्लॅटचा ताबा दिला नाही. संबंधित कंपन्या आणि संचालकांवर फ्लॅट खरेदीदारांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. रुद्र बिल्डवेल कंपनीचा गौतम गंभीर हा ब्रँड ॲम्बेसेडर आहे. त्‍यामुळे त्‍याच्‍याही नावाचा तक्रारीत समावेश होता.

Web Title:
संबंधित बातम्या