Home / News / अभिनेता मुश्ताक खान यांचे अपहरण! १२ तास छळ

अभिनेता मुश्ताक खान यांचे अपहरण! १२ तास छळ

मुंबई – प्रसिद्ध कॉमेडियन सुनील पाल याचे काही दिवसांपूर्वी अपहरण झाल्याची घटना ताजी असतानाच अभिनेते मुश्ताक खान यांचेही अपहरण झाल्याचे...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

मुंबई – प्रसिद्ध कॉमेडियन सुनील पाल याचे काही दिवसांपूर्वी अपहरण झाल्याची घटना ताजी असतानाच अभिनेते मुश्ताक खान यांचेही अपहरण झाल्याचे उघडकीस आले आहे. मेरठ-दिल्ली हायवे येथून त्यांचे अपहरण झाले होते. अपहरणकर्त्यांनी मुश्ताक खान यांचा १२ तास छळ केला. पण, संधीचा फायदा घेत त्यांना स्वतःचा जीव वाचवण्यात यश आले होते. ही घटना २० नोव्हेंबरला घडली असून तिची तक्रार काल दाखल करण्यात आली.

मुश्ताक खान एका पुरस्कार सोहळ्यात सहभागी होण्यासाठी दिल्लीला गेले होते. त्यासाठी त्यांना विमान तिकिटे व आगाऊ रक्कम दिली होती. दिल्लीत पोहचल्यावर त्यांना फसवून चुकीच्या गाडीत बसवून बिजनोरजवळ निर्जन स्थळी नेण्यात आले. खान यांचे व्यवसाय भागीदार शिवम यादव यांच्या माहितीनुसार, सुमारे १२ तास त्यांचा छळ करून, त्यांच्याकडे १ कोटींची मागणी करण्यात आली. अपहरणकर्त्यांनी खान व त्यांच्या मुलाच्या खात्यातून २ लाख रुपये वसूल केले. पहाटे खान यांना बांगेच्या आवाजाने जाग आली. त्यानंतर संधीचा फायदा घेत खान यांनी पलायन केले. लोकांच्या आणि पोलिसांच्या मदतीने ते सुरक्षित घरी पोहचले. यादव यांनी काल याप्रकरणी बिजनोर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केली. काही दिवसांत दोन अभिनेत्यांचे अपहरण झाल्याने सिनेसृष्टीत खळबळ माजली आहे.

Web Title:
संबंधित बातम्या