Home / News / थायलंडमध्ये महोत्सवात स्फोट ! तीन जणांचा मृत्यू

थायलंडमध्ये महोत्सवात स्फोट ! तीन जणांचा मृत्यू

बँकॉक – थायलंडच्या उम्फांग जिल्ह्यात रेड क्रॉस फेअर महोत्सवात सहभागी झालेल्या लोकांवर स्फोटके फेकल्यामुळे ३ जणांचा मृत्यू झाला, तर डझनभर...

By: E-Paper Navakal

बँकॉक – थायलंडच्या उम्फांग जिल्ह्यात रेड क्रॉस फेअर महोत्सवात सहभागी झालेल्या लोकांवर स्फोटके फेकल्यामुळे ३ जणांचा मृत्यू झाला, तर डझनभर लोक जखमी झाले. याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली.

या महोत्सवाचा लोक आनंद घेत असताना दोन जणांनी त्यांच्यावर स्फोटके फेकली. त्यामुळे महोत्सवाच्या ठिकाणी एकच गोंधळ उडाला आणि लोकांची पळापळ सुरू झाली. या घटनेत ३ जणांचा मृत्यू झाला, तर जखमी झालेल्या १२ जणांना रुग्णालयात दाखल केले. थायलंडच्या पंतप्रधान शिनावात्रा यांनी एक्सवर पोस्ट केली की, या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या लोकांबद्दल मी शोक व्यक्त करते. याप्रकरणी पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांना सखोल चौकशी करण्याचे आणि जखमी लोकांना मदत करण्याचे आदेश दिले आहेत. त्यासोबत मी सर्व कार्यक्रम आणि महोत्सवाच्या ठिकाणी पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्याचे निर्देशही दिले आहे.

Web Title:
संबंधित बातम्या

Share:

More Posts