Home / News / मशिदीत ‘जय श्री राम’च्या घोषणा देणे अपराध कसा? सुप्रीम कोर्टाचा सवाल

मशिदीत ‘जय श्री राम’च्या घोषणा देणे अपराध कसा? सुप्रीम कोर्टाचा सवाल

बंगळुरु – मशिदीमध्ये ‘जय श्री राम’ च्या घोषणा दिल्याने धार्मिक भावना दुखावल्या गेल्याच्या आरोपावरून दाखल केलेला खटला रद्द करण्याच्या उच्च...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

बंगळुरु – मशिदीमध्ये ‘जय श्री राम’ च्या घोषणा दिल्याने धार्मिक भावना दुखावल्या गेल्याच्या आरोपावरून दाखल केलेला खटला रद्द करण्याच्या उच्च न्याय़ालयाच्या आदेशाला आव्हान देण्याच्या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने कर्नाटक सरकारला नोटीस बजावली आहे. मशिदीत जय श्री राम च्या घोषणा देणे अपराध कसा अशी विचारणा या नोटिसीद्वारे न्यायालयाने केली आहे.
हे प्रकरण कर्नाटकच्या दक्षिण कन्नड जिल्ह्यातील आहे. येथे दोन जणांनी मशिदीमध्ये शिरून जय श्री राम अशा घोषणा दिल्या होत्या. त्यावर आक्षेप घेत मशिदीच्य़ा व्यवस्थापनाने पोलिसांत तक्रार दाखल केली होती. हा खटला कर्नाटक उच्च न्यायलयात पोहोचला. उच्च न्यायालयाने हा खटला रद्द केला.या निर्णयाला मशिद व्यवस्थापनाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. या याचिकेवरील सुनावणीप्रसंगी सर्वोच्च न्यायालयाने कर्नाटक सरकारला नोटीस पाठवून भूमिका स्पष्ट करण्यास सांगितले.

Web Title:
संबंधित बातम्या