Home / News / कोस्टल रोडवर दोन गाड्यांची धडक! ६ जण जखमी

कोस्टल रोडवर दोन गाड्यांची धडक! ६ जण जखमी

मुंबई- मुंबईच्या कोस्टल रोडवर आज सकाळी दोन गाड्यांची समोरासमोर धडक झाली. नरिमन पॉइंटच्या दिशेने जाणाऱ्या बोगद्यात हा अपघात झाला. या...

By: E-Paper Navakal

मुंबई- मुंबईच्या कोस्टल रोडवर आज सकाळी दोन गाड्यांची समोरासमोर धडक झाली. नरिमन पॉइंटच्या दिशेने जाणाऱ्या बोगद्यात हा अपघात झाला. या अपघातात सहा जण किरकोळ जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन, त्यांनी मदतकार्य सुरु केले. या अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले असून अपघाताचे कारण स्पष्ट झालेले नाही . मात्र या अपघातामुळे कोस्टल रोडवर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.

Web Title:
संबंधित बातम्या