Home / News / सावंतवाडी टर्मिनसला मधू दंडवते यांचे नाव देण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

सावंतवाडी टर्मिनसला मधू दंडवते यांचे नाव देण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

सावंतवाडी – सावंतवाडी रेल्वे टर्मिनसला दिवंगत प्रा.मधू दंडवते यांचे नाव द्यावे असा ठराव या हिवाळी अधिवेशनामध्ये पारित करावा अशी मागणी...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

सावंतवाडी – सावंतवाडी रेल्वे टर्मिनसला दिवंगत प्रा.मधू दंडवते यांचे नाव द्यावे असा ठराव या हिवाळी अधिवेशनामध्ये पारित करावा अशी मागणी अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती मुंबईच्या वतीने मुंख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. तसेच कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण करून रोहा ते मडूरा भाग मध्य रेल्वेत सहभागी करावा अशी मागणी त्यांनी केली.
या निवेदनात असे म्हटले आहे की, सध्या कोकण रेल्वेवर ६ हजार कोटींचे कर्ज आहे. कोकण रेल्वेला भारतीय रेल्वेत विलीनीकरण करा. जेणेकरून रखडलेल्या कामे लवकर पूर्ण केली जातील. तसेच कोकण रेल्वेचा महाराष्ट्रातील भाग रोहा ते मडूरा हा भारतीय रेल्वेच्या मध्य रेल्वेमध्ये विलीनीकरणाबाबत केंद्राकडे शिफारस करावी.

Web Title:
संबंधित बातम्या