Home / News / तिलारी खोर्‍यातील गावांत जंगली हत्तीची मोठी दहशत

तिलारी खोर्‍यातील गावांत जंगली हत्तीची मोठी दहशत

सिंधुदुर्ग – दोडामार्ग तालुक्यात गेल्या आठवड्यात आलेल्या एका जंगली हत्तीने तिलारी खोर्‍यातील गावांत मोठी दहशत निर्माण केली आहे. २० डिसेंबरच्या...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

सिंधुदुर्ग – दोडामार्ग तालुक्यात गेल्या आठवड्यात आलेल्या एका जंगली हत्तीने तिलारी खोर्‍यातील गावांत मोठी दहशत निर्माण केली आहे. २० डिसेंबरच्या रात्री या हत्तीने तालुक्यातील हेवाळे गावातील सूर्यकांत देसाई यांच्या बागेतील झाड तोडून श्रीपत देसाई यांच्या गुरांच्या गोठ्यावर टाकले.

यामुळे गोठ्याच्या छतावरील पत्रे गुरांच्या अंगावर पडले. यामुळे एक गाय आणि एक बैल गंभीर झाला. या हत्तीने एका रात्रीत शेती आणि बागायतीमध्ये धुमाकूळ घालून मोठे नुकसान केले.हा जंगली हत्ती आता मनुष्यवस्तीत येऊ लागल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन विभागाच्या पथकाने घटनास्थळी येऊन फटाके फोडल्यावर हत्ती जंगलात पळून गेला. गेली अनेक वर्षे जीवित आणि वित्त हानी करणार्‍या या हत्तीचा वन विभागाने बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.

Web Title:
संबंधित बातम्या