Home / News / कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो पंतप्रधानपदाचा राजीनामा देण्याची शक्यता

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो पंतप्रधानपदाचा राजीनामा देण्याची शक्यता

Justin Trudeau likely to announce resignation: कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो (Justin Trudeau) लवकरच पंतप्रधानपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. पुढील एक ते दोन दिवसात...

By: E-Paper Navakal

Justin Trudeau likely to announce resignation: कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो (Justin Trudeau) लवकरच पंतप्रधानपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. पुढील एक ते दोन दिवसात ते त्यांच्या पदाचा राजीनामा देऊ शकतात. ट्रुडो यांना मागील काही काळापासून देशांतर्गत राजकारणात संकटाचा सामना करावा लागत आहे. त्यांच्या सरकारमध्ये सहभागी असणाऱ्या न्यू डेमोक्रेटिक पक्षाने पाठिंबा देण्यास देखील नकार दिला होता. त्यामुळे त्यांचे सरकार अल्पमतात आहे.

कॅनडामध्ये याचवर्षी निवडणुका होणार आहेत. त्याआधीच जस्टिन ट्रुडोंकडून (Justin Trudeau) राजीनामा दिला जाण्याची शक्यता आहे. राजीनाम्यानंतर ते निवडणुका घेण्याची घोषणा करू शकतात. राजीनामा दिल्यानंतर नवीन नेत्याची निवड होईपर्यंत, ते पदावर कायम राहणार की नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये कॅनडाच्या अर्थमंत्री क्रिस्टिया फ्रीलँड यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला होता. हा ट्रूडो सरकारसाठी मोठा धक्का होता. आर्थिक धोरणांवरून त्यांच्यात मदभेद पाहायला मिळाले होते. याशिवाय, डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडावर आयात करावरून देखील निशाणा साधला होता.

फ्रीलँड यांच्यानंतर ट्रुडो (Canada PM Justin Trudeau) यांच्यावर पद सोडण्यासाठी दबाव टाकला जात होता. तसेच, यावर्षीच्या अखेरीस कॅनडामध्ये निवडणुका पार पडणार आहेत. मात्र, निवडणुकीआधीच्या सर्वेक्षणामध्ये त्यांच्या पराभवाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

2013 मध्ये ट्रूडो यांची लिबरल पक्षाचे नेते म्हणून निवड करण्यात आली होती. 2015 पासून ते कॅनडाचे पंतप्रधान (Canada PM Justin Trudeau) म्हणून कार्यरत आहेत.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या