Home / News /  भारतासाठी का महत्त्वाची आहे स्पॅडेक्स मोहीम? जाणून घ्या

 भारतासाठी का महत्त्वाची आहे स्पॅडेक्स मोहीम? जाणून घ्या

Spadex Mission Isro Space Docking: भारतीय अंतराळ संशोधन संस्थाने (ISRO) काही दिवसांपूर्वी स्पॅडेक्स मिशन (Spadex Mission) लाँच केले होते. या मिशन अंतर्गत...

By: E-Paper Navakal

Spadex Mission Isro Space Docking: भारतीय अंतराळ संशोधन संस्थाने (ISRO) काही दिवसांपूर्वी स्पॅडेक्स मिशन (Spadex Mission) लाँच केले होते. या मिशन अंतर्गत दोन उपग्रहांना अवकाशात प्रक्षेपित करण्यात आले होते. आता इस्त्रोने स्पेस डॉकिंग एक्सपेरिमेंटचे (SPADEX) यशस्वी परीक्षण केले. इस्रोने दोन उपग्रहांमधील अंतर आधी 15 मीटर, नंतर 3 मीटरपर्यंत ठेवले. त्यानंतर दोन्ही उपग्रहांना पुन्हा सुरक्षित अंतरावर नेण्यात आले. डॉकिंग प्रक्रिया केवळ डेटा विश्लेषण झाल्यानंतरच केली जाईल, असे इस्त्रोने सांगितले.

इस्रो इतिहास रचण्यापासून फक्त काही मीटर दूर आहे. स्पेस डॉकिंग एक्सपेरिमेंट मिशनमध्ये (Spadex Mission)  सध्या दोन उपग्रह, SDX01 (चेजर) आणि SDX02 (टार्गेट) यांच्यातील अंतर फक्त 3 मीटर आहे. पुढील काही तासात डॉकिंग प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. हे परीक्षण यशस्वीरित्या पूर्ण झाल्यास अशी कामगिरी करणारा भारत हा जगातील चौथा देश ठरेल.

स्पॅडेक्स मिशन काय आहे?

स्पॅडेक्स मिशन (Spadex Mission) भारताच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे. या मिशन अतंर्गत उपग्रहांना अतंराळात ‘डॉक’ आणि ‘अनडॉक’ करण्यात येणार आहे. म्हणजेच, अंतराळात दोन यानाला एकमेकांशी जोडणे व पुन्हा वेगळे करणे. या मिशन अतंर्गत चेझर (SDX01) आणि टार्गेट (SDX02) नावाच्या दोन उपग्रहांचे 30 डिसेंबरला प्रक्षेपित करण्यात आले.

भारताने अंतराळासंबंधित अनेक योजना आखल्या आहेत. अंतराळात स्पेस स्टेशनची निर्मिती, अंतराळवीरांना चंद्रांवर पाठवणे यासारख्या मिशनसाठी स्पॅडेक्स मिशन यशस्वी होणे महत्त्वाचे आहे. अंतराळात डॉक व अनडॉक प्रक्रिया पार पाडणे अवघड असते. हे मिशन भारत कमी खर्चात पूर्ण करू शकल्यास ही मोठी कामगिरी असेल. भविष्यातील अंतराळ मोहिमांमधील खर्च देखील यामुळे कमी होईल.  हे मिशन यशस्वी झाल्यास भारत हा अमेरिका, रशिया आणि चीननंतर जगातील चौथा देश असेल.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या