Home / देश-विदेश / ‘या’ कंपनीने लाँच केला जिओच्या ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित पहिला स्मार्ट टीव्ही, जाणून घ्या किंमत-फीचर्स

‘या’ कंपनीने लाँच केला जिओच्या ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित पहिला स्मार्ट टीव्ही, जाणून घ्या किंमत-फीचर्स

Thomson TV : फ्रेंच इलेक्ट्रॉनिक्स ब्रँड थॉमसनने नवीन JioTele ऑपरेटिंग सिस्टिमवर आधारित 43-इंच QLED TV लाँच केला आहे. कंपनीचा हा नवीन टीव्ही 4K रिझोल्यूशन व्हिज्युअल्स,  HDR आणि डॉल्बी ऑडिओचा सपोर्टसह...

By: Team Navakal

Thomson TV : फ्रेंच इलेक्ट्रॉनिक्स ब्रँड थॉमसनने नवीन JioTele ऑपरेटिंग सिस्टिमवर आधारित 43-इंच QLED TV लाँच केला आहे. कंपनीचा हा नवीन टीव्ही 4K रिझोल्यूशन व्हिज्युअल्स,  HDR आणि डॉल्बी ऑडिओचा सपोर्टसह येतो. यूजर्सला चांगला अनुभव या टीव्हीमध्ये JioTele OS चा वापर करण्यात आला आहे. Thomson च्या या नवीन स्मार्ट टीव्हीची किंमत आणि फीचर्सविषयी जाणून घेऊया.

Thomson 43-इंच QLED TV ची किंमत

JioTele OS वर आधारित THOMSON 43-इंच QLED TV भारतात ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर 21 फेब्रुवारी पासून उपलब्ध झाला आहे. या स्मार्ट टीव्हीची किंमत 18,999 रुपये आहे.,  कंपनी नवीन टीव्ही सोबत तीन महिन्यांसाठी JioHotstar आणि JioSaavn, तसेच एक महिन्यासाठी JioGames चे सबस्क्रिप्शन मोफत देत आहे.

थॉमसन 43-इंच QLED TV चे स्पेसिफिकेशन्स 

थॉमसनचा हा टीव्ही 43-इंच QLED डिस्प्लेसह येतो, ज्यामध्ये 4K रिझोल्यूशन, 1.1 बिलियन रंग, HDR सपोर्ट आणि 450 निट्स ब्राइटनेस आहे. ऑडिओसाठी 40W डॉल्बी ऑडिओ स्टिरिओ बॉक्स स्पीकर दिला आहे.

वायरलेस कनेक्टिव्हिटीसाठी ब्लूटूथ 5.0 आणि ड्युअल बँड WiFi (2.4GHz + 5GHz) सपोर्ट मिळतो. हा टीव्ही Amlogic प्रोसेसरवर चालतो, ज्यामध्ये 2GB RAM आणि 8GB स्टोरेज आहे.

कनेक्टिव्हिटीसाठी HDMI 3 (ARC, CEC) आणि USB 2 पोर्ट्स उपलब्ध आहेत. हा टीव्ही JioTele OS वर कार्य करतो आणि स्पीकर/हेडफोन, गेम कंट्रोलर, माऊस व कीबोर्डला सपोर्ट करतो.

Web Title:
For more updates: , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या