Home / चंदेरी च्युइंगम / साउथ सुपरस्टार मोहनलाल यांनी केली ‘दृश्यम 3’ची घोषणा

साउथ सुपरस्टार मोहनलाल यांनी केली ‘दृश्यम 3’ची घोषणा

Drishyam 3 : ‘दृश्यम’ आणि ‘दृश्यम 2’ सुपरहिट ठरल्यानंतर आता निर्मात्यांनी ‘दृश्यम 3’ ची घोषणा केली आहे. स्वतः साउथ सुपरस्टार मोहनलाल यांनी या चित्रपटाची घोषणा करत चाहत्यांना सुखद...

By: Team Navakal

Drishyam 3 : ‘दृश्यम’ आणि ‘दृश्यम 2’ सुपरहिट ठरल्यानंतर आता निर्मात्यांनी ‘दृश्यम 3’ ची घोषणा केली आहे. स्वतः साउथ सुपरस्टार मोहनलाल यांनी या चित्रपटाची घोषणा करत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. मल्याळम भाषेतील ‘दृश्यम’ चित्रपट 2013 साली आणि ‘दृश्यम 2’ हा 2021 मध्ये रिलीज झाला होता. या दोन्ही चित्रपटांना चांगला प्रतिसाद मिळाला. विविध भाषेत रिमेकची देखील निर्मिती करण्यात आली. आता मोहनलाल यांनी ‘दृश्यम 3’ घोषणा केली आहे.

अभिनेता अजय देवगणने मोहनलाल यांच्या ‘दृश्यम’चा हिंदीत रीमेक तयार केला होता. या चित्रपटालाही बॉक्स ऑफिसवर जबरदस्त प्रतिसाद मिळाला होता. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत मोहनलालने दृश्यम 3 ची घोषणा केली. “भूतकाळ कधीही शांत बसत नाही. दृश्यम 3 कन्फर्म!, अशा कॅप्शनसह मोहनलाल यांनी चित्रपटाची घोषणा केली. त्यांनी एक फोटोही शेअर केला आहे. ज्यामुळे त्यांच्यासोबत चित्रपटाचे दिग्दर्शक जीतू जोसेफ आणि निर्माता अँटोनी पेरुंबवूर हे दिसत आहेत.

विशेष म्हणजे मोहनलाल यांच्या ‘दृश्यम’चा सहा भाषांमध्ये रीमेक तयार झाला आहे. हा चित्रपट सर्वप्रथम मलयाळममध्ये बनवला गेला, त्यानंतर हिंदी, तमिळ, तेलगू, कन्नड, सिंहली आणि चिनी भाषेतही शूट करण्यात आला.

सर्वाधिक कमाई चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनने केली आहे. तुम्ही अजय देवगण आणि तब्बू यांची प्रमुख भूमिका असलेला ‘दृश्यम’ आणि ‘दृश्यम 2’ ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्स आणि अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर पाहू शकता.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या