Home / Top_News / ‘या’ तारखेला शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता

‘या’ तारखेला शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता

PM Kisan Yojana: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेच्या 19व्या हप्त्याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या योजनाच्या 19व्या हप्त्याची प्रतीक्षा करणाऱ्या...

By: Team Navakal

PM Kisan Yojana: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेच्या 19व्या हप्त्याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या योजनाच्या 19व्या हप्त्याची प्रतीक्षा करणाऱ्या लाखो शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 24 फेब्रुवारी 2025 रोजी पैसे जमा होणार आहेत. 

‘सन्माननीय पंतप्रधान 24 फेब्रुवारी 2025 रोजी पीएम योजनेचा 19वा हप्ता जारी करतील. PM-KISAN नोंदणीकृत शेतकऱ्यांसाठी ईकेवायसी अनिवार्य आहे. ओटीपी आधारित ईकेवायसी PM-KISAN पोर्टलवर उपलब्ध आहे, तसेच बायोमेट्रिक आधारित ईकेवायसी साठी जवळच्या CSC केंद्राशी संपर्क साधावा’, असे पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइटवर नमूद केले आहे.

सर्व शेतकऱ्यांसाठी e-KYC अनिवार्य आहे. e-KYC पूर्ण केल्याशिवाय शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही. शेतकरी pmkisan.gov.in या वेबसाइटला भेट देऊन e-KYC प्रक्रिया पूर्ण करू शकतात.

योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज कसा करावा? 

  • सर्वात आधी PM Kisan ची अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in वर जा. 
  • “New Farmer Registration” वर क्लिक करा. 
  • वैयक्तिक माहिती (नाव, आधार क्रमांक, राज्य इ.) भरा. 
  • बँक खाते तपशील आणि जमीन नोंदणी कागदपत्रे अपलोड करा. 
  • नोंदणीकृत मोबाइल नंबरवर आलेल्या OTP द्वारे व्हेरिफाय करा. 
  • सबमिट केल्यानंतर, तुमचा अर्ज प्रक्रियेत जाईल.
Web Title:
For more updates: , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या