Home / News / लवकरच प्रतिक्षा संपणार! या तारखेला पृथ्वीवर परतणार अंतराळवीर सुनीता विल्यम्स

लवकरच प्रतिक्षा संपणार! या तारखेला पृथ्वीवर परतणार अंतराळवीर सुनीता विल्यम्स

Nasa Astronaut Sunita Williams : अंतराळवीर सुनीता विल्यम्स (Sunita Williams) या मागील आठ महिन्यांहून अधिक काळ अंतराळात अडकल्या आहेत. मात्र, आता त्या लवकरच...

By: Team Navakal

Nasa Astronaut Sunita Williams : अंतराळवीर सुनीता विल्यम्स (Sunita Williams) या मागील आठ महिन्यांहून अधिक काळ अंतराळात अडकल्या आहेत. मात्र, आता त्या लवकरच पृथ्वीवर परतण्याची शक्यता आहे. सुनीता विल्यम्स यांच्या अंतराळ मोहिमेचा मार्चमध्ये समारोप होणार आहे.

विल्यम्स आणि त्यांचे सहकारी अंतराळवीर बुच विलमोअर यांनी माहिती दिली की Crew-10मोहीम 12 मार्चला पृथ्वीवरून प्रक्षेपित होईल आणि आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) पोहोचेल. हे अंतराळवीर आयएसएसवर महिने असतील.

हे अंतराळवीर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचल्यानंतर, सुनीता विल्यम्स आणि बुच विलमोअर त्यांची जबाबदारी या नवीन सदस्यांकडे सोपवतील. तसेच, नवीन स्पेस स्टेशन कमांडर जबाबदारी स्विकारेल.  सध्या सुनीता विल्यम्स ISS च्या कमांडर आहेत.

संपूर्ण जबाबदारीचे हस्तांतरण केल्यानंतर Crew-10 ला अंतराळ स्थानकावर घेऊन जाणाऱ्या ड्रॅगन स्पेसक्राफ्टच्या माध्यमातून सुनीता विल्यम्स आणि बुच विलमोअरला घेऊन पृथ्वीवर परतील. विल्यम्स या 19 मार्चला पृथ्वीवर परतण्याचा अंदाज आहे. पृथ्वीवर परतल्यानंतर विल्यम्स यांनी येथील वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी काही दिवस लागू शकतात. 8 महिन्यांपासून अंतराळात असल्याने त्यांच्या शरीरावर मोठा परिणाम झाला असण्याची शक्यता आहे. त्यामुळे परतल्यानंतर जवळपास 45 दिवस त्यांना पृथ्वीवरील वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी लागू शकतात.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या