2025 Honda Shine 125 : भारतीय बाजारात होंडाची Shine 125 ही सर्वात लोकप्रिय बाइकपैकी एक आहे. शाइन 125 चा भारतातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या बाइकचा समावेश होतो. आता कंपनीने या बाइकचे नवीन मॉडेल सादर केले आहे. गाडीची सुरुवाती किंमत 84,493 रुपये (एक्स-शोरूम) ठेवण्यात आली आहे.
2025 Shine 125 ही च्या डिझाइनबद्दल सांगायचे तर नवीन बाइकच्या बॉडीवर्कमध्ये फारसा बदल करण्यात आलेला नाही. याचे डिझाइन काहीसे जुन्या मॉडेलप्रमाणेच आहेत. मात्र, कंपनीने बाइकला नवीन रंगांसह सादर केले आहे.
या बाइकला ग्राहक पर्ल इग्नियस ब्लॅक, जेनी ग्रे-मेटॅलिक, मॅट अॅक्सिस ग्रे-मेटॅलिक, रिबेल रेड-मेटॅलिक, डीसेंट ब्लू मेटॅलिक आणि पर्ल साइरन-ब्लू या रंगात खरेदी करू शकतात.
कंपनीने अपडेटेड होंडा शाइन 125 ला डिजिटल डिस्प्लेसह सादर केले आहे. यात स्पीडोमीटर, इंधनाची माहिती आणि इतर गोष्टींची माहिती मिळते. इंजिनबद्दल सांगायचे तर यात OBD2 मानक पूर्ण करणारे 123.94cc चे सिंगल-सिलेंडर इंजिन दिले असून, हे 10.63 bhp ची पॉवर आणि 11Nm टॉर्क जनरेट करते. इंजिन 5-स्पीड गिअरबॉक्ससोबत जोडलेले आहे.
नवीन शाइनमध्ये टेलिस्कोपिक फ्रंट फोर्क्स आणि ड्युअल रिअर स्प्रिंग सस्पेन्शन पाहायला मिळते. ब्रेकिंगसाठी, व्हेरिएंटनुसार फ्रंट ड्रम किंवा डिस्क आणि रिअर ड्रम ब्रेक सेटअप देण्यात आला आहे.
नवीन होंडा शाइन 125 च्या किंमतीबाबत सांगायचे तर कंपनीने ड्रम ब्रेक व्हेरिएंटना 84,493 रुपये आणि डिस्क ब्रेक व्हेरिएंटला 89,245 रुपये (एक्स-शोरूम) किंमतीत सादर केले आहे.









