Home / News /  भारताचा पासपोर्ट किती शक्तिशाली? किती देशात मिळतो व्हिसाशिवाय प्रवेश? जाणून घ्या

 भारताचा पासपोर्ट किती शक्तिशाली? किती देशात मिळतो व्हिसाशिवाय प्रवेश? जाणून घ्या

Passport Index Ranking: हेन्ली पासपोर्ट इंडेक्स 2025 मध्ये जगभरातील देशांच्या पासपोर्ट रँकिंगची यादी जाहीर करण्यात आली आहे. या लिस्टमध्ये सिंगापूरचा पासपोर्ट जगातील सर्वात...

By: Team Navakal

Passport Index Ranking: हेन्ली पासपोर्ट इंडेक्स 2025 मध्ये जगभरातील देशांच्या पासपोर्ट रँकिंगची यादी जाहीर करण्यात आली आहे. या लिस्टमध्ये सिंगापूरचा पासपोर्ट जगातील सर्वात शक्तिशाली ठरला आहे. तर भारतीय पासपोर्ट 80व्या क्रमांकावर आहे. भारतासोबतच, अल्जेरिया, इक्वेटोरियल गिनी आणि ताजिकिस्तान या देशांचा पासपोर्ट देखील यादीत 80व्या क्रमांकावर आहे. या क्रमवारीत देशांना त्यांच्या व्हिसा-मुक्त प्रवेशाच्या आधारे स्थान दिले जाते.

हेन्ली पासपोर्ट इंडेक्स 2025 नुसार भारतीय पासपोर्ट जागतिक क्रमवारीत 80व्या स्थानावर असून, भारतीय पासपोर्टधारकांना एकूण 58 देशांमध्ये व्हिसाशिवाय प्रवास करण्याची सुविधा आहे. या यादीमध्ये सिंगापूर सर्वात पुढे असून, या देशातील नागरिकांना 193 देशांमध्ये व्हिसाशिवाय प्रवेश मिळतो.

हेन्ली अँड पार्टनर्स या सरकारी सल्लागार सेवांमध्ये विशेष तज्ज्ञ असलेली जागतिक सल्लागार कंपनीद्वारे ही यादी तयार केली जाती. जगातील 99 देशांच्या पोसपोर्टला व्हिसा-मुक्त किंवा व्हिसा-ऑन-अरायव्हल प्रवेश देण्याच्या आधारावर क्रमवारी ठरवली जाते. 

या वर्षीच्या रँकिंगमध्ये काही महत्त्वाचे बदल पाहायला मिळाले आहेत. मागील वर्षी सिंगापूर, जपान आणि अन्य सहा देश संयुक्तपणे पहिल्या स्थानावर होते. मात्र, यंदा सिंगापूर एकमेव देश पहिल्या क्रमांकावर आहे. या यादीमध्ये इराक, सीरिया आणि अफगाणिस्तान हे सर्वात शेवटच्या स्थानावर आहेत.

Web Title:
For more updates: , stay tuned with Navakal
Topics:
संबंधित बातम्या