Home / News / ओलाची पहिली शानदार इलेक्ट्रिक बाइक लाँच, जाणून घ्या किंमत-फीचर्स

ओलाची पहिली शानदार इलेक्ट्रिक बाइक लाँच, जाणून घ्या किंमत-फीचर्स

Ola Roadster X  : ओला इलेक्ट्रिकने भारतीय बाजारात कंपनीची पहिली इलेक्ट्रिक बाईक Roadster X  ला लाँच केले आहे. काही महिन्यांपूर्वी कंपनीने या बाईकचे प्रोटोटाइप...

By: Team Navakal

Ola Roadster X  : ओला इलेक्ट्रिकने भारतीय बाजारात कंपनीची पहिली इलेक्ट्रिक बाईक Roadster X  ला लाँच केले आहे. काही महिन्यांपूर्वी कंपनीने या बाईकचे प्रोटोटाइप सादर केले होता. आता कंपनीने आपल्या या पहिल्या इलेक्ट्रिक बाईकला अधिकृतपणे विक्रीसाठी उपलब्ध करून दिले आहे. कंपनीने Roadster X ला दोन वेगवेगळ्या मॉडेल आणि बॅटरीपक सह लाँच केले आहे. या इलेक्ट्रिक बाइकच्या किंमत आणि फीचर्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.

Roadster X चे स्पेसिफिकेशन्स

रोडस्टर X इलेक्ट्रिक बाइकमध्ये4.3-इंच LCD स्क्रीन, टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन, अॅडव्हान्स्ड रीजेन, क्रूझ कंट्रोल, TPMS (टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम) आणि OTA  अपडेट्स यांसारख्या अत्याधुनिक फीचर्स देण्यात आले आहेत.

ही बाइक – स्पोर्ट्स, नॉर्मल आणि इको अशा तीन राइडिंग मोड्समध्ये येते. यात पुढील बाजूला डिस्क ब्रेक आणि मागील बाजूला ड्रम ब्रेक सिस्टम देण्यात आली आहे. रोडस्टर X Plus मध्ये हे सर्व फीचर्स देण्यात आले आहे.

यासोबतच, एनर्जी इनसाइट्स, अॅडव्हान्स्ड रीजेन, क्रूझ कंट्रोल आणि रिव्हर्स मोड यांसारखी फीचर्स देखील यात मिळतात. या बाईकमध्ये ब्रेक-बाय-वायर टेक्नॉलॉजीसह कॉम्बी ब्रेकिंग सिस्टम (CBS) देण्यात आली आहे.

Roadster X आणि Roadster X Plus ची किंमत

रोडस्टर X मध्ये 2.5kWh, 3.5kWh आणि 4.5kWh बॅटरी पॅकचा पर्याय मिळतो. या बॅटरी पॅकच्या किंमती अनुक्रमे 74,999 रुपये, 84,999 रुपये आणि 95,999 रुपये आहेत. या तीन मॉडेल्सची रेंज अनुक्रमे 140, 196 आणि 252 किलोमीटर आहे.

रोडस्टर X Plus 4.5kWh बॅटरी पॅक आणि  9.1kWh बॅटरी पॅकसह उपलब्ध आहे. यांची रेंज अनुक्रमे 252 किलोमीटर आणि 501 किलोमीटरपर्यंत आहे. तर किंमत अनुक्रमे 1.05 लाख रुपये आणि 1.55 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे.

Web Title:
For more updates: , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या