Home / क्रीडा / मास्टर ब्लास्टर सचिनचा ‘तो’ विक्रम मोडणार रोहित शर्मा, इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत मोठी कामगिरी करण्याची संधी

मास्टर ब्लास्टर सचिनचा ‘तो’ विक्रम मोडणार रोहित शर्मा, इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत मोठी कामगिरी करण्याची संधी

Rohit Sharma: रोहित शर्मा 2025 मध्ये प्रथमच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याच्या तयारीत आहे. इंग्लंडविरुद्धच्या (Ind vs Eng) तीन वनडे सामन्यांच्या मालिकेत रोहित शर्मा...

By: Team Navakal

Rohit Sharma: रोहित शर्मा 2025 मध्ये प्रथमच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याच्या तयारीत आहे. इंग्लंडविरुद्धच्या (Ind vs Eng) तीन वनडे सामन्यांच्या मालिकेत रोहित शर्मा खेळताना दिसणार आहे. या मालिकेत एक नवीन विक्रम स्वतःच्या नावावर करण्याची संधी रोहित शर्माकडे आहे. यासोबतच, सचिन तेंडुलकरचा मोठा विक्रम देखील रोहित शर्मा या मालिकेत मोडू शकतो.

रोहित शर्माने आतापर्यत 265 सामन्यांच्या 257 डावांमध्ये 10,866 धावा केल्या आहेत आणि वनडे क्रिकेटमध्ये 11,000 धावांचा टप्पा गाठण्यासाठी त्याला केवळ 134 धावांची आवश्यकता आहे. याशिवाय, दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात जलद 11 हजार धावा करणारा फलंदाज ठरण्याची देखील त्याच्याकडे संधी आहे.

सचिन तेंडुलकरने 276 डावांमध्ये 11 हजार धावांचा टप्पा गाठला होता. त्यामुळे, जर रोहितने पुढील 19 डावांमध्ये 134 धावा केल्या, तर तो वनडे क्रिकेटमध्ये 11,000 धावा पूर्ण करणारा विराट कोहलीनंतरचा दुसऱ्या क्रमांकाचा वेगवान फलंदाज बनेल. विराटने 222 डावांमध्ये 11,000 धावा पूर्ण केल्या होत्या. तो वनडे क्रिकेटमध्ये सर्वात जलद 10,000 धावा करणारा देखील खेळाडू आहे.

रोहितने आतापर्यंत वनडे क्रिकेटमध्ये 265 सामन्यांच्या 257 डावांमध्ये 49.17 च्या सरासरीने एकूण 10866 धावा केल्या आहेतयात 31 शतके, 3 द्विशतके आणि 57 अर्धशतकांचा समावेश आहे. 6 फेब्रुवारीपासून इंग्लंडविरुद्ध सुरू होणाऱ्या मालिकेत रोहितकडे 11 हजार धावांचा टप्पा गाठण्याची संधी आहे.

Web Title:
For more updates: , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या