Home / News / पुरंदर विमानतळ प्रकल्पाविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन, जमीन संपादनाला विरोध

पुरंदर विमानतळ प्रकल्पाविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन, जमीन संपादनाला विरोध

Purandar Airport: पुण्यातील पुरंदर तालुक्यात प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम सुरू आहे. या विमानतळाचे काम पूर्ण करण्यासाठी शासनाने हालचाली सुरू केल्या आहेत....

By: Team Navakal

Purandar Airport: पुण्यातील पुरंदर तालुक्यात प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम सुरू आहे. या विमानतळाचे काम पूर्ण करण्यासाठी शासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. काही महिन्यापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विमानतळासाठी आवश्यक असलेले  भूमी अधिग्रहण करण्याचे आदेश दिले होते. मात्र, या विमानतळामुळे प्रभावित होणाऱ्या गावकऱ्यांकडून मोठा विराध केला जात आहे.

विमानतळाविरोधात गावकऱ्यांनी पंचायत समिती कार्यालयाबाहेर जोरदार आंदोलन केले. काळे झेंडे आणि फलक हातात घेत गावकऱ्यांनी जमिनीच्या संपादनाविरोधात शेतकऱ्यांनी एल्गार पुकारला आहे. अपुरी भरपाई आणि मानतळामुळे होणाऱ्या पर्यावरणीय व सामाजिक-आर्थिक परिणामांबाबतही चिंता व्यक्त केली जात आहे.

वर्ष 2016 मध्ये पहिल्यांदा या प्रकल्पाची घोषणा करण्यात आली होती. तेव्हापासूनच या विमानतळाला विरोध होत आहे. सरकारकडून या विमानतळामुळे विकासाला गती मिळेल आणि रोजगार निर्माण होतील, असे सांगितले जात आहे. तर स्थानिकांकडून जमिनीचे संपादन, पर्यावरणाचे नुकसान, विस्थापन यामुळे या प्रकल्पाविरोधात आंदोलन केले जात आहे.

प्रभावित गावांमध्ये वनपुरी, उदाचीवादी, कुंभारवळण, एखतपूर, मुंजवडी, खानवडी आणि पारगावचा समावेश आहे. स्थानिकांकडून शेतजमीन आणि फळबागांच्या नुकसानीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. अंजीर, सीताफळ आणि डाळिंबाच्या लागवडी या परिसरातील लोकांच्या उपजीविकेचा प्रमुख साधन आहे. त्यामुळे त्यांच्यावर मोठे आर्थिक संकट ओढवू शकते. जमिनीचे संपादन झाल्याने विस्थापित व्हावे लागेल, यामुळे शेतकऱ्यांकडून या प्रकल्पाला विरोध केला जात आहे.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या