Home / News / Vi ने लाँच केले दोन स्वस्त प्रीपेड प्लॅन्स, कमी किंमतीत मिळतील जास्त फायदे

Vi ने लाँच केले दोन स्वस्त प्रीपेड प्लॅन्स, कमी किंमतीत मिळतील जास्त फायदे

Vi Recharge Plans: टेलिकॉम कंपनी व्हीआयच्या ग्राहकांची संख्या जिओ आणि एअरटेलच्या तुलनेत कमी आहे. असे असले तरीही कंपनीकडून कमी किंमतीत जास्त फायदे...

By: Team Navakal

Vi Recharge Plans: टेलिकॉम कंपनी व्हीआयच्या ग्राहकांची संख्या जिओ आणि एअरटेलच्या तुलनेत कमी आहे. असे असले तरीही कंपनीकडून कमी किंमतीत जास्त फायदे देणारे अनेक रिचार्ज प्लॅन्स ग्राहकांसाठी आणले जातात. आता कंपनीने दोन स्वस्त वॉइस ओनली प्लॅन्सस लाँच केले आहेत. या प्लॅन्समध्ये डेटा मिळत नाही. मात्र, ग्राहकांना जास्त दिवसांची वैधता मिळते. व्हीआयच्या या नवीन प्लॅन्सविषयी जाणून घेऊया.

Vi चा 470 रुपयांचा प्लॅन

व्हीआयच्या 470 रुपयांच्या प्लॅनची वैधता 84 दिवस आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना 84 दिवसांसाठी सर्व नेटवर्क्सवर देशभरात अनलिमिटेड वॉइस कॉलिंगचा फायदा दिला जातो. याशिवाय, प्लॅनमध्ये एकूण 900 एसएमएस दिले जातात.

Vi चा 1849 रुपयांचा प्लॅन

वतुम्ही जर वर्षभराच्या वैधतेसह येणारा प्लॅन शोधत असाल तर या रिचार्ज प्लॅनचा नक्की विचार करू शकता. 1849 रुपयांच्या रिचार्जमध्ये तुम्हाला 365 दिवसांची वैधता मिळते. तसेच, वर्षभर सर्व नेटवर्क्सवर अनलिमिटेड वॉइस कॉलिंग आणि एकूण 3600 मोफत एसएमएस दिले जातात. या दोन्ही प्लॅन्समध्ये डेटाची सुविधा मिळत नाही. ट्रायच्या निर्देशानंतर कंपन्यांकडून केवळ कॉलिंग आणि एसएमएससह येणारे प्लॅन्स लाँच केले जात आहेत. ग्राहकांना डेटाची गरज नसताना त्यावर अतिरिक्त पैसे खर्च करावे लागू नये, असे ट्रायने म्हटले होते. त्यानंतर आता हे प्लॅन्स कंपनीने लाँच केले आहेत.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
Topics:
संबंधित बातम्या