Home / News / करणवीर मेहरा ठरला ‘बिग बॉस 18’चा विजेता; ट्रॉफीसह मिळाली तब्बल ‘एवढी’ बक्षीस रक्कम

करणवीर मेहरा ठरला ‘बिग बॉस 18’चा विजेता; ट्रॉफीसह मिळाली तब्बल ‘एवढी’ बक्षीस रक्कम

Bigg Boss 18 Winner Karanveer Mehra: बिग बॉस 18 च्या ग्रँड फिनालेमध्ये करणवीर मेहराने ट्रॉफी आपल्या नावावर केली आहे. करणवीरने विवियन डीसेनाला मागे टाकत बिग...

By: Team Navakal

Bigg Boss 18 Winner Karanveer Mehra: बिग बॉस 18 च्या ग्रँड फिनालेमध्ये करणवीर मेहराने ट्रॉफी आपल्या नावावर केली आहे. करणवीरने विवियन डीसेनाला मागे टाकत बिग बॉस 18 चा किताब जिंकला आहे. करणवीरला या सोबतच, 50 लाख रुपयांचे रोख बक्षीस देखील मिळाले आहे.

सलमान खान होस्ट असलेल्या बिग बॉसच्या 18व्या (Bigg Boss 18 ) पर्वाला 6 ऑक्टोबर 2024 ला सुरुवात झाली होती. जवळपास 100 दिवसानंतर या पर्वाला नवीन विजेता मिळाला आहे. बिग बॉस 18 ची ट्रॉफी नावावर करणाऱ्या करणवीरने (Karanveer Mehra) काही महिन्यांपूर्वीच ‘खतरों के खिलाडी’ हो शो देखील जिंकला होता.

टॉप 6 च्या रेसमध्ये ईशा सिंग, चुम दारंग, अविनाश मिश्रा, रजत दलाल, करणवीर मेहरा आणि विवियन डीसेना हे स्पर्धक पोहोचले होते. फिनालेमध्ये सर्वात आधी ईशा बाहेर पडली. त्यानंतर चुम आणि नंतर अविनाश बाहेर पडले. रजत दलाल टॉप 3 पर्यंत पोहोचले. अखेर विवियन डीसेनाला मागे टाकत करणवीरने बिग बॉसची ट्रॉफी नावावर केली.

कोण आहे करणवीर मेहरा?

बिग बॉस 18 चा विजेता करणवीर मेहरा मूळ दिल्लीचा आहे. त्याचा जन्म 28 डिसेंबर 1977 रोजी झाला. त्याने मसूरीतील एका बोर्डिंग स्कूलमधून 10 वीपर्यंतची शालेय शिक्षण घेतले. तसेच, दिल्ली विश्वविद्यालयातून पदवी प्राप्त केली. त्याने 2004 मध्ये टीव्ही शो ‘रीमिक्स’ मधून इंडस्ट्रीमध्ये डेब्यू केला होता. त्यानंतर त्यांनी ‘बीवी और मैं’, ‘रागिनी एमएमएस 2’, ‘मेरे डैड की मारुति’ आणि ‘इट्स नॉट दैट सिंपल’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. काही महिन्यांपूर्वीच खतरों के खिलाडी 14 चा देखील तो विजेता ठरला होता.

Web Title:
For more updates: , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या