Home / News / सुरक्षित गुंतवणुकीचा सर्वोत्तम पर्याय, ‘या’ बँका मुदत ठेवीवर देत आहेत 9 टक्क्यांपर्यं व्याज

सुरक्षित गुंतवणुकीचा सर्वोत्तम पर्याय, ‘या’ बँका मुदत ठेवीवर देत आहेत 9 टक्क्यांपर्यं व्याज

Fixed Deposit Interest Rates 2025: शेअर्स, म्युच्युअल फंड, सोने या तुलनेत आजही मुदत ठेवीला (Fixed Deposit) गुंतवणुकीसाठी अधिक प्राधान्य दिले जाते. मुदत ठेव...

By: Team Navakal

Fixed Deposit Interest Rates 2025: शेअर्स, म्युच्युअल फंड, सोने या तुलनेत आजही मुदत ठेवीला (Fixed Deposit) गुंतवणुकीसाठी अधिक प्राधान्य दिले जाते. मुदत ठेव हा गुंतवणुकीचा सुरक्षित व जास्त परतावा देणारा लोकप्रिय प्रकार आहे. मात्र, अनेकजण मुदत ठेवीवरील व्याजदर कमी असते म्हणून यात गुंतवणूक करणे टाळतात. परंतु, काही बँका आणि वित्तीय संस्था मुदत ठेवीवर देखील जास्त व्याजदर देतात. मुदत ठेवीवर जास्त परतावा देणाऱ्या अशाच बँकांविषयी जाणून घेऊया.

उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक

या बँकेकडून गुंतवणूकदारांना मुदत ठेवीवर आकर्षक परतावा दिला जातो. बँकेकडून 9 महिन्यांच्या FD वर 7.50% व्याज दिले जाते. 12 महिन्यांसाठी 8.25% पर्यंत व्याज, 1 वर्ष ते 560 दिवसांपर्यंतच्या मुदत ठेवीवर 8% आणि 561 दिवस ते 990 दिवसपर्यंतच्या मुदत ठेवीवर 7.75% व्याज मिळेल. याशिवाय, 991 दिवस ते 5 वर्षे पर्यंतच्या मुदत ठेवीवर 7.20% ब्याज मिळेल.

AU स्मॉल फायनान्स बँक

AU स्मॉल फायनान्स बँकेकडूनही मुदत ठेवीवर चांगले व्याज दर दिले जाते.  तुम्ही 6 महिने ते 12 महिन्यांपर्यंत FD केली, तर तुम्हाला 7.25% व्याज मिळेल. 12 महिने ते 15 महिन्यांपर्यंतच्या ठेवीवर 7.85% आणि 18 महिन्या ठेवीवर 8% व्याज मिळेल. 24 महिने ते 36 महिन्यांपर्यंतच्या ठेवीवर 7.50% ठेवीवर व्याज दिले जाते. दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी हा एक चांगला पर्याय होऊ शकतो.

यूनिटी स्मॉल फायनान्स बँक

यूनिटी स्मॉल फायनान्स बँकेकडून 501 दिवसांच्या ठेवीवर 8.75% व्याज दिले जाते. 502 दिवस ते 18 महिन्यांपर्यंतच्या ठेवीवर 7.85% आणि 18 महिने ते 700 दिवसांपर्यंतच्या FD वर 7.90% व्याज मिळेल. 701 दिवसांच्या FD वर देखील 8.75% व्याज दिले जाते. आणि 1001 दिवसांसाठी 9 टक्के व्याज मिळले.

उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक

उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक 365 ते 699 दिवसांपर्यंतच्या एफडीवर 8% व्याज देते 2 वर्ष ते 3 वर्षांपर्यंतच्या ठेवीवर 8.50%, 4 वर्ष ते 5 वर्षांपर्यंतच्या ठेवीवर 7.75% व्याज मिळेल.  1500 दिवसांच्या FD वर सर्वाधिक 8.50% व्याजाचा फायदा मिळतो.

(नोंद: कोणत्याही गुंतवणुकीमध्ये नुकसान होण्याची शक्यता असते. या लेखातील माहिती हा कोणत्याही प्रकारचा गुंतवणुकीचा सल्ला नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
Topics:
संबंधित बातम्या