Home / क्रीडा / Gabba Stadium : ऑस्ट्रेलियातील ऐतिहासिक गाबा स्टेडियम पाडणार? नक्की कारण काय?

Gabba Stadium : ऑस्ट्रेलियातील ऐतिहासिक गाबा स्टेडियम पाडणार? नक्की कारण काय?

Gabba stadium to be demolished | ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेन येथील ऐतिहासिक गाबा स्टेडियम (Gabba stadium) पाडले जाणार आहे. गाबा स्टेडियम 2032...

By: Team Navakal

Gabba stadium to be demolished | ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेन येथील ऐतिहासिक गाबा स्टेडियम (Gabba stadium) पाडले जाणार आहे. गाबा स्टेडियम 2032 ऑलिम्पिक (2032 olympics) आणि पॅरलिम्पिकच्या आयोजनानंतर पाडले जाईल. गाबा अनेक वर्षांपासून क्रिकेट आणि AFL (ऑस्ट्रेलियन फुटबॉल लीग) चे प्रमुख केंद्र राहिले आहे. या मैदानावर आतापर्यंत अनेक ऐतिहासिक सामने खेळले गेले आहेत. 

आता सरकारने घोषणा केली आहे की गाबाच्या जागी ब्रिस्बेनच्या (Brisbane Cricket Ground) विक्टोरिया पार्कमध्ये सुमारे 63,000 प्रेक्षक क्षमता असलेले नवीन, अत्याधुनिक स्टेडियम बांधले जाईल. हे नवीन स्टेडियम भविष्यात मोठ्या स्पर्धांचे यजमानपद भूषवेल.

गाबाच्या मैदानावर 1931 पासून कसोटीक्रिकेटचे आयोजन केले जात आहे. या मैदानावर पहिला कसोटी सामना 1931 मध्ये खेळला गेला होता. आतापर्यंत येथे 67 पुरुषांच्या टेस्ट सामने झाले आहेत, तसेच महिला संघानेही दोन कसोटी सामने खेळले आहेत.

गेल्या काही वर्षांत गाबा स्टेडियममधील मर्यादित सुविधांमुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे. याच मैदानावर भारताने 2021 च्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफी दरम्यान ऑस्ट्रेलियाला (Australia Cricket) 1988 नंतर प्रथमच पराभूत केले होते. या सामन्यात चेतेश्वर पुजारा आणि ऋषभ पंतने भारतासाठी महत्त्वपूर्ण खेळी खेळली होती. 

गाबामध्ये ऑस्ट्रेलियाला पराभूत करणे कोणत्याही संघासाठी कठीण असते. या मैदानावर अनेक ऐतिहासिक सामने खेळले गेले आहेत. मात्र, 2032 ऑल्म्पिकनंतर हे स्टेडियम पाडून, नवीन अत्याधुनिक स्टेडियम बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नवीन स्टेडियम उभारण्यासाठी अंदाजित रे 3.8 अब्ज ऑस्ट्रेलियन डॉलर्स खर्च येऊ शकतो. हे स्टेडियम क्रिकेट, AFL आणि इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या यजमानपदासाठी योग्य प्रकारे डिझाइन केले जाईल. क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि क्वीन्सलँड क्रिकेटने या निर्णयाला पाठिंबा दिला आहे.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या