Home / News / ट्रम्प यांची 25% ‘ऑटो टॅरिफ’ची घोषणा, टाटा मोटर्ससह ‘या’ भारतीय कंपन्यांवर परिणाम

ट्रम्प यांची 25% ‘ऑटो टॅरिफ’ची घोषणा, टाटा मोटर्ससह ‘या’ भारतीय कंपन्यांवर परिणाम

Tariff On Imported Cars | अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी परदेशी वाहन आयातीवर 25 टक्के शुल्क लावण्याची घोषणा...

By: Team Navakal

Tariff On Imported Cars | अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी परदेशी वाहन आयातीवर 25 टक्के शुल्क लावण्याची घोषणा केली आहे. या निर्णयाचा प्रभाव टाटा मोटर्स (Tata motors), आयशर मोटर्स, सोना बीएलडब्ल्यू आणि सम्वर्धन मादर्सन यांसारख्या भारतीय कंपन्यांवर (Trump Tariff Impact) पडण्याची शक्यता आहे. या कंपन्या युरोप, जपान, दक्षिण कोरिया आणि चीनला ऑटो पार्ट्सची निर्यात करतात व या देशातून अमेरिका वाहनांची आयात करते.

डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा अमेरिकेत आयात होणाऱ्या सर्व परदेशी कार्सवर आता 25 टक्के शुल्क लावले जाईल अशी घोषणा केली आहे. विशेष म्हणजे, ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे की हा तात्पुरता निर्णय नसून, कायमस्वरूपी राहणार आहे. अमेरिकेच्या या निर्णयाचा परिणाम टाटा मोटर्स (Tata motors), महिंद्रा आणि आयशर मोटर्स सारख्या ऑटोमोबाईल क्षेत्रातील अनेक भारतीय कंपन्यांवर होण्याची शक्यता आहे.

ट्रम्प यांच्या घोषणेचा परिणाम शेअर बाजारावरही पाहायला मिळाला आहे. या निर्णयानंतरच अनेक ऑटो कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमतीत घसरण पाहायला मिळाली. याचा सर्वाधिक फटका टाटा मोटर्सला बसला.

टाटा मोटर्सची (Tata motors) अमेरिकेत थेट निर्यात नाही, पण उपकंपनी जॅग्वार लँड रोव्हरची (JLR) अमेरिकन बाजारपेठेत मजबूत पकड आहे. कंपनीच्या एकूण विक्रीपैकी 22 टक्के विक्री अमेरिकेत होते. आर्थिक वर्ष 2024 मध्ये कंपनीने जगभरात सुमारे 4 लाख वाहने विकली, ज्यामध्ये अमेरिका ही प्रमुख बाजारपेठांपैकी एक होती. जॅग्वार लँड रोव्हरची अमेरिका बाजारात विकली जाणारी वाहने प्रामुख्याने यूके आणि अन्य आंतरराष्ट्रीय उत्पादन केंद्रांमध्ये तयार केली जातात. मात्र, आता या वाहनांवर 25 टक्के टॅरिफ लागू होणार आहे.

ट्रम्प यांच्या निर्णयाचा परिणाम टाटा मोटर्स, सोना कॉम्स्टार, भारत फोर्ज, संवर्धन मदरसन, महिंद्रा अँड महिंद्रा, बजाज ऑटो, टीव्हीएस मोटर, रॉमकृष्ण फोर्जिंग्ज, सन्सेरा इंजिनीअरिंग आणि सुप्रजित इंजिनीअरिंग या भारतीय कंपन्यांवर मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. या कंपन्या वाहने किंवा ऑटो पार्ट्सच्या निर्यातीत महत्त्वाची भूमिका बजावतात.

Web Title:
For more updates: , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या