मुंबई – प्रो कबड्डीमुळे गल्लीबोळातील अस्सल मराठी कबड्डीला आता चांगले दिवस आले आहेत. कबड्डी खेळ ग्लॅमरस झाला आहे.याच प्रो कबड्डीच्या धर्तीवर सुरू झालेली एमएमकेएल म्हणजेच ‘महामुंबई कबड्डी लीग’स्पर्धा यंदा २६ एप्रिल ते ३ मे या कालावधीत होणार आहे. अभिनव कला क्रीडा अकॅडमी,अभिनव क्रीडा मंडळ-गोरेगाव,एकता क्रीडा मंडळ-वडगाव, मुंबई आणि महा मुंबई कबड्डी फाऊंडेशनच्यावतीने समाजसेवक अंकुश रामचंद्र मोरे यांच्या एकसष्ठी निमित्त ही तिसरी जिल्हास्तरीय ‘महामुंबई कबड्डी लीग’ ‘मुंबई उपनगर कबड्डी संघटनेच्या मान्यतेने पार पडणार आहे.
या स्पर्धेची माहिती देताना अंकुश मोरे यांनी सांगितले की, या ‘कबड्डी महाकुंभ ‘ मध्ये महामुंबई कबड्डी प्रीमियर लीग पर्व ३ व सुपर सीनियर (सब-ज्युनियर सीनियर महिला/पुरुष) राज्यस्तरीय कबड्डी लीग (४० ते ५० वयोगट -आणि ५०च्या पुढे वयोगट) (महिला व पुरुष) स्पर्धा २०२५ होणार आहेत. गोरेगाव (पूर्व) दिंडोशी येथील मीनाताई ठाकरे स्मृती क्रीडांगणावर ही स्पर्धा होणार आहेत.
								
								
								
								
								
				
															
								
								
								
								
								
								








