बँकॉक – थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये भूकंपामुळे ३० मजली बांधकामाधीन इमारत जमीनदोस्त झाली. ही इमारत बांधणार्या चिनी कंपनीविरोधात थायलंड सरकारने चौकशीचे आदेश दिले. याप्रकरणी पोलिसांनी ४ चिनी नागरिकांनी देखील अटक केली. त्यामुळे चीन आणि थायलंडमध्ये संबंध बिघडण्याची शक्यता आहे.
या इमारतीच्या बांधकामाशी संबंधित दस्तऐवज नष्ट आणि त्यात छेडछाड केल्याचा आरोप या चिनी नागरिकांवर करण्यात आला आहेत. चिनी कंपनीने बांधलेल्या संपूर्ण इमारतींची यादी तयार करण्याचे आदेश सरकारने दिले. चीनच्या बांधकाम कंपन्यांवर प्रश्न उपस्थित करत सरकारने स्पष्ट केले की, चिनी कंपन्यांचे बांधकाम दर्जाहीन असते का, याचीही चौकशी सुरू करण्यात येईल. थायलंडच्या रिअल इस्टेट क्षेत्रात चीनचा मोठा वाटा आहे.त्यामुळे सरकार थायलंडमधील चीनच्या सर्व प्रकल्पांची चौकशी करणार आहेत.
								
								
								
								
								
				
															
								
								
								
								
								
								








