Home / News / साताऱ्यात महिला पोलिसाचा हृदयविकाराने मृत्यू

साताऱ्यात महिला पोलिसाचा हृदयविकाराने मृत्यू

सातारा – साताऱ्यातील मलकापुरात आज महिला पोलीस सत्त्वशीला पवार (३७) यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. त्यांच्यावर संगम माहुली येथे शासकीय इतमामात...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

सातारा – साताऱ्यातील मलकापुरात आज महिला पोलीस सत्त्वशीला पवार (३७) यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. त्यांच्यावर संगम माहुली येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
कऱ्हाड तालुक्यातील शहापूर हे त्यांचे माहेर, तर सातारा हे सासर होते. सत्वशीला पवार या मागील वर्षभर कोयना बिनतारी संदेश यंत्रणा विभागात कार्यरत होत्या. आज सकाळी ७ वाजताच्या सुमारास त्यांना अस्वस्थ वाटल्याने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात त्यांच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी येथील करण्यात आल्यानंतर नातेवाईकांनी त्यांचा मृतदेह ताब्यात घेतला.

Web Title:
संबंधित बातम्या