Home / News / ज्ञानेश्वर माऊलींच्या 750 जन्मशताब्दी वर्षानिमित्त नाणे

ज्ञानेश्वर माऊलींच्या 750 जन्मशताब्दी वर्षानिमित्त नाणे

नेवासे – संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचे 750 वे जन्मशताब्दी वर्ष महाराष्ट्र शासनातर्फे साजरे करण्यात येईल तसेच या निमित्ताने चलनी नाणे काढण्याची...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

नेवासे – संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचे 750 वे जन्मशताब्दी वर्ष महाराष्ट्र शासनातर्फे साजरे करण्यात येईल तसेच या निमित्ताने चलनी नाणे काढण्याची विनंती भारतीय रिझर्व्ह बँकेला शासनातर्फे करण्यात येईल, अशी घोषणा, सांस्कृतिक कार्य मंत्री अँड आशिष शेलार यांनी नेवासे येथे केली.

श्री क्षेत्र तारकेश्वर गडाचा ४७ वा नारळी सप्ताहानिमित्त श्री क्षेत्र महालक्ष्मी हिवरे, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर येथे आयोजित “मोगरा फुलला” या सांस्कृतिक, प्रबोधनात्मक, भक्तीमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार उपस्थित होते. महंत आदिनाथ शास्त्री महाराज यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

Web Title:
संबंधित बातम्या